प्रसार भारतीचे अध्यक्ष नवनीत कुमार सेहगल यांनी आकाशवाणी मुंबई केंद्राला दिली भेट

प्रसार भारतीचे अध्यक्ष नवनीत कुमार सेहगल यांनी दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यादरम्यान आज आकाशवाणी मुंबई केंद्राला भेट दिली आणि सर्व विभागांच्या कामाचा आढावा घेतला. श्रोत्यांना आवडण्याजोग्या कार्यक्रमांवर लक्ष केंद्रित करण्याची सूचना त्यांनी आकाशवाणीच्या अधिकाऱ्यांना बैठकीदरम्यान केली. युवा आणि महिला केंद्रित कार्यक्रमांवर अधिक भर घ्यावा, आर्थिक आत्मनिर्भरतेच्या दृष्टीने अधिकाधिक कार्यक्रम जाहिरातदारांपर्यंत घेऊन जावेत, असा सल्लाही त्यांनी दिला. वृत्तविभागाच्या प्रमुख सरस्वती कुवळेकर, कार्यक्रम प्रमुख नारायण पवार, कार्यालय प्रमुख श्रीकृष्ण क्षीरसागर यांच्यासह आकाशवाणी आणि दूरदर्शनचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.