February 26, 2025 1:51 PM | Kumbhvani channel

printer

महाकुंभ पर्वात देशाचं सांस्कृतिक बंध दृढ करण्यात प्रसारभारतीची महत्त्वाची भूमिका – प्रसारभारती अध्यक्ष नवनीत सेहगल

महाकुंभ पर्वात देशाचे सांस्कृतिक बंध दृढ करण्यात प्रसारभारतीनं महत्त्वाची भूमिका बजावली असल्याचं प्रसारभारतीचे अध्यक्ष नवनीत सेहगल यांनी म्हटलं आहे. या पर्वाचे सर्व ४८ दिवस चाललेल्या कुंभवाणी वाहिनीमार्फत आकाशवाणीने करोडो लोकांशी संपर्क साधला, असं ते म्हणाले.

 

देशाची सार्वजनिक प्रसारण व्यवस्था म्हणून आकाशवाणीने या उत्सवात चोख कामगिरी बजावली असं प्रसारभारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव द्विवेदी म्हणाले. कुंभवाणीमार्फत कमीतकमी वेळात अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचण्याच्या आकाशवाणीच्या कामगिरीबद्दल महासंचालक प्रज्ञा पालिवाल – गौर यांनी प्रशंसा केली.