डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

December 24, 2024 3:39 PM | Pralhad Joshi

printer

ई-कॉमर्समधले गैरव्यवहार रोखण्यासाठीच्या उपाययोजनांचं उद्घाटन

राष्ट्रीय ग्राहक दिनाच्या निमित्ताने ऑनलाईन व्यासपीठांवरचा धोका ओळखण्यासाठी आणि ग्राहकांना सक्षम करण्यासाठी केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी यांनी आज तीन नव्या ऍपचं उद्घाटन केलं. यात जागो ग्राहक जागो ऍप, जागृती ऍप, आणि जागृती डॅशबोर्डचा समावेश आहे. या ऍपमुळे फसवणुकीच्या प्रकरणाविरोधात कारवाई करणं केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधीकरणाला शक्य होणार आहे. जागो ग्राहक ऍपमुळे ग्राहकांना URL ची माहिती मिळणं शक्य होणार आहे. तसंच यातून काही धोका असल्यास ग्राहकाला सावधानतेचा इशारा दिला जाणार आहे. जागृती ऍपमुळे ग्राहकांना URL ची तक्रार करता येणार आहे. 

 

 

सरकार ग्राहकांच्या हक्कांचं संरक्षण करण्यासाठी वचनबद्ध आहे असं प्रल्हाद जोशी यांनी यावेळी सांगितंल. सुरक्षित, पारदर्शक बाजारपेठ उपलब्ध करून  देण्यासाठी  आणि ऑनलाईन व्यासपीठांवरील फसवणूक रोखण्यासाठी  सरकार वचनबद्ध असल्याचंही जोशी  म्हणाले.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.