बिहारमध्ये गुरु गोविंद सिंगजी यांच्या ३५८व्या जयंतीनिमित्त तीन दिवसीय प्रकाश उत्सव

बिहारमधील पाटणा शहरातील तख्त श्री हरमंदिर साहिब इथं शीख समुदायाचे १०वे आणि शेवटचे शीखगुरू गुरु गोविंद सिंगजी यांच्या ३५८व्या जयंतीनिमित्त तीन दिवसीय प्रकाश उत्सव सोहळ्याला काल सुरुवात झाली. तख्त श्री हरमंदिर साहिब हे गुरु गोविंद सिंगजी यांचं जन्मस्थान आहे. यानिमित्तानं आज भव्य नगर कीर्तन अर्थात मिरवणूक काढण्यात येणार असून त्याची सांगता तख्त श्री हरमंदिर साहिब इथं होणार आहे. प्रकाश पर्वचा मुख्य सोहळा उद्या मध्यरात्री गुरु ग्रंथसाहिबच्या पवित्र श्लोकांचे पठण आणि फटाक्यांच्या आतषबाजीत साजरा केला जाणार आहे. या प्रकाशपर्व सोहळ्याला देश-विदेशातील भाविक मोठ्या संख्येनं उपस्थित आहेत.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.