अनुसूचित जातींसाठीच्या आरक्षणाच्या उपवर्गीकरणासाठी स्थापन केलेल्या समितीला वंचित बहुजन आघाडीचा विरोध

राज्यातल्या महायुती सरकारनं अनुसूचित जातींसाठीच्या आरक्षणाच्या उपवर्गीकरणासाठी स्थापन केलेल्या समितीला वंचित बहुजन आघाडीनं विरोध केला आहे. वंचित बहुजन आघाडीचे नेते ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी आज मुंबईत वार्ताहर परिषदेत ही भूमिका मांडली. राज्य सरकारनं काल अध्यादेश काढून यासाठी निवृत्त न्यायाधिशांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली आहे. मागासवर्गीयांचं आरक्षण निकामी करण्याच्या उद्देशानंच हा अध्यादेश महाविकास आघाडीतल्या घटक पक्षाच्या संमतीनं काढला असल्याचा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला.