पाकिस्तान सोबत केलेल्या अघोषित युद्धाबाबत चांगली कामगिरी केल्याचं प्रमाणपत्र शरद पवार यांनी नुकतंच दिलं आहे, त्यामुळे शरद पवार हे आता भाजपामय होत असल्याची टीका, वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. ते लातूरमध्ये पक्ष कार्यकर्त्यांच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलत होते. राज्यात विरोधी पक्षच अस्तित्वात नसून वंचित बहुजन आघाडी पक्ष सोडला तर सगळे पक्ष हे सत्ताधारी पक्षांसोबत असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली.
Site Admin | May 21, 2025 3:46 PM
शरद पवार आता भाजपामय होत असल्याची प्रकाश आंबेडकर यांची टीका
