डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

केंद्र सरकार लवकरच प्रधानमंत्री कुसुम योजनेचा दुसरा टप्पा सुरू करणार

प्रधानमंत्री कुसुम योजनेला राजस्थान, गुजरात आणि मध्य प्रदेशात मिळालेल्या यशानंतर आता केंद्र सरकार लवकरच प्रधानमंत्री कुसुम योजनेचा दुसरा टप्पा सुरू करणार असल्याची घोषणा नवीन आणि नवीकरणीय उर्जा मंत्री प्रल्हाद जोशी यांनी केली आहे. ते आज आयआयटी मुंबई इथे आयव्हीसीए नवीकरणीय ऊर्जा शिखर परिषदेत बोलत होते. 

 

नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रातल्या गुंतवणूकदारांनी सौर, पवन आणि जैव इंधनांपासून वीजनिर्मितीसाठी दिलेल्या पाठिंब्यामुळे हे शक्य झाल्याचंही जोशी यावेळी म्हणाले. भारताचं स्वच्छ ऊर्जा परिवर्तन हे केवळ पर्यावरणाच्या दृष्टीनं नाही तर ते एक राष्ट्रीय ध्येय आहे.

 

नवीकरणीय ऊर्जा क्षमता वाढीमध्ये भारत आता जागतिक स्तरावर अव्वल तीन देशांमध्ये येतो. त्यामुळे २०३०पर्यंत आपल्या सरकारचं ५०० गिगावॅट गैर जैवइंधन क्षमतेचं लक्ष्य साध्य करण्यासाठी खासगी गुंतवणूक महत्त्वाची ठरेल, हेही जोशी यांनी यावेळी अधोरेखित केलं. 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.