डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

प्रधानमंत्री मुद्रा योजनेची दशकपूर्ती

प्रधानमंत्री मुद्रा योजनेला १० वर्ष पूर्ण होत आहेत. या योजनेअंतर्गत आतापर्यंत ३२ लाख कोटी रुपयांची ५२ कोटींहून अधिक कर्जं वितरित करण्यात आली आहेत. आर्थिक समावेशन आणि उद्योजकांच्या सक्षमीकरणासाठी सूक्ष्म आणि लघु उद्योजकांना १० लाखांपर्यंतचं तारणमुक्त कर्ज उपलब्ध करून देण्याच्या उद्देशानं पंतप्रधान मोदींनी २०१५ मध्ये ही योजना सुरू केली होती. मुद्रा योजनेच्या दशक पूर्तीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी या योजनेच्या लाभार्थ्यांशी संवाद साधणार असून सकाळी ९ वाजता हा कार्यक्रम प्रसारित केला जाणार आहे.