प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत ५२ कोटीहून अधिक कर्ज मंजूर

प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत आजपर्यंत ३२ लाख कोटीपेक्षा जास्त किमतीचे  ५२ कोटीहून अधिक कर्ज मंजूर करण्यात आलं आहे.  यापैकी ७० टक्के कर्ज महिला उद्योजकांनी घेतल्याचं आकडेवारीतून समोर आलं आहे. तर एकूण कर्जापैकी ५० टक्के कर्ज एससी, एसटी आणि ओबीसी प्रवर्गातल्या उद्योजकांनी घेतलं आहे. लघु उद्योजकांना सक्षम करण्यासाठी ही योजना २०१५ पासून सुरू करण्यात आली आहे.