डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या ३५ लाखांहून अधिक लाभार्थ्यांना वीम्याच्या दाव्याचं वाटप

प्रधानमंत्री पीक विमा योजने अंतर्गत देशातल्या ३५ लाखांहून अधिक शेतकऱ्यांना आज तीन हजार ९०० कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या पीक विमा दाव्यांचं वाटप करण्यात आलं. केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी राजस्थानात झुंझुनू इथं आयोजित कार्यक्रमात रिमोटची कळ दाबून शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम हस्तांतरित केली. यात महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना खरिपातल्या नुकसान भरपाईपोटी ८०९ कोटी तर रब्बीसाठी ११२ कोटी असे एकंदर ९२१ कोटी रुपये मिळाले. 

 

प्रधानमंत्र्यांनी पीकविमा योजनेत मोठ्या प्रमाणात सुधारणा केली असून २०१६ पासून आतापर्यंत दोन लाख १२ हजार कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहेत, असं कृषिमंत्री यावेळी म्हणाले.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा