प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत 2023-24 या शैक्षणिक वर्षात राज्यातील सर्व शाळांमधून परसबाग उपक्रमास प्रोत्साहन देण्यासाठी घेण्यात आलेल्या परसबाग स्पर्धेत गडचिरोली जिल्ह्याच्या मुलचेरा तालुक्यातील उदयनगर बांग्ला जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या परसबागेला राज्यात प्रथम क्रमांक मिळाला आहे. येत्या रविवारी पुण्यात राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेतर्फे आयोजित कार्यक्रमात शाळेला सन्मानित करण्यात येणार आहे.
Site Admin | September 27, 2024 10:52 AM
गडचिरोली जिल्ह्यातल्या उदयनगर बांग्ला प्राथमिक शाळेच्या परसबागेला राज्यात प्रथम क्रमांक
