September 10, 2024 8:03 PM

printer

प्रधानमंत्री मत्स्य किसान समृद्धी सह योजनेचा उद्या शुभारंभ

प्रधानमंत्री मत्स्य किसान समृद्धी सह योजनेचा शुभारंभ उद्या नवी दिल्ली इथं केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्री, राजीव रंजन सिंह यांच्या हस्ते होणार आहे. मत्स्यव्यवसाय क्षेत्रातल्या उत्पादन आणि प्रक्रियेच्या क्लस्टर्सवरच्या मानक कार्यप्रणाली देखील सिंह यावेळी जाहीर करतील. प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेंतर्गत 2024-25 या आर्थिक वर्षात राष्ट्रीय स्तरावरच्या प्रकल्पांना प्राधान्य देण्याविषयीही सिंह मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यक्रमाला मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय राज्यमंत्री एस. पी. सिंग बघेल, राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मत्स्यव्यवसाय विभागाचे प्रतिनिधी तसंच योजनेचे लाभार्थी, मच्छिमार उपस्थित राहणार आहेत. 

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.