वन्य प्राण्यांचे हल्ले आणि धानाच्या पिकात पाणी साचणं यालाही आता प्रधानमंत्री पीकविमा योजनेचं संरक्षण मिळणार आहे. वन्यप्राण्यांमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीला आता स्थानिक जोखीम म्हणून, तर धानाच्या पिकात पाणी साचून झालेल्या नुकसानीला स्थानिक आणीबाणी म्हणून मान्यता देण्यात आल्याची माहिती कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयानं दिली. या अनुषंगानं राज्यं, पिकाचं नुकसान करणाऱ्या वन्य प्राण्यांची यादी तयार करतील आणि ऐतिहासिक माहितीच्या आधारे प्रभावित जिल्हे किंवा विमा विभाग निश्चित करतील. नुकसान झाल्यानंतर ७२ तासांच्या आत वीकविमा ॲपवरून शेतकऱ्यांना जिओटॅग असलेल्या फोटोंसह नुकसानीची माहिती द्यावी लागेल. हा निर्णय २०२६च्या खरीप हंगामापासून लागू होणार आहे.
Site Admin | November 18, 2025 7:26 PM | PMFBY
वन्य प्राण्यांचे हल्ले आणि धान पीकात पाणी साचण्यालाही प्रधानमंत्री पीकविमा योजनेचं संरक्षण मिळणार