प्रसिद्ध कोल्हापुरी चपलेच्या रचनेचा अनधिकृतपणे वापर केल्याबद्दल प्राडा या जागतिक फॅशन संस्थेविरुद्ध कारवाई करण्याची मागणी करणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. २२ जून रोजी इटलीत मिलान इथे झालेल्या फॅशन शोदरम्यान प्राडाने सादर केलेल्या चपलांच्या रचनेचं कोल्हापुरी चपलांशी साम्य असल्याचा आरोप या याचिकेत करण्यात आला आहे. कोल्हापुरी चपलांना जीआय मानांकन असून प्राडाने या चोरीविषयी माफी मागावी अशी मागणीही या याचिकेत करण्यात आली आहे.
Site Admin | July 4, 2025 7:12 PM | Kolhapuri Chappals | Prada
कोल्हापुरी चपलेच्या रचनेचा अनधिकृतपणे वापर केल्याबद्दल प्राडा संस्थेविरुद्ध कारवाईची मागणी
