भंडाऱ्यात महिलांना खेळाच्या माध्यमातून पोषक आहाराचं महत्त्व

देशभरात सध्या पोषण पंधरवडा राबवण्यात येत आहे. या अंतर्गत गरोदर तसंच स्तन्यदा माता, आणि बालकांच्या आरोग्याच्या दृष्टीनं सकस आहार पुरवण्यावर भर दिला जात आहे. भंडारा जिल्ह्यात महिला आणि बालकल्याण विभाग तसंच जिल्हा आरोग्यविभागाच्यावतीनं या निमित्त विविध खेळांच्या माध्यमातून पोषक आहाराचं महत्त्व महिला आणि मुलांना समजावून देण्यात आलं.