डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

April 7, 2025 7:14 PM | Poshan Maah 2024

printer

पोषण पंधरवडा उद्यापासून साजरा करण्यात येणार

केंद्रीय महिला आणि बालकल्याण मंत्रालयातर्फे उद्यापासून पोषण पंधरवडा साजरा करण्यात येणार आहे. पोषण पंधरवाड्याचं हे सातवं वर्ष असून यंदा बाळाच्या जन्मापासूनच्या एक हजार दिवसांमधलं पोषण, पोषण ट्रॅकरमार्फत अधिकाधिक लाभार्थ्यांना लाभ, कुपोषणावर मात आणि लहान मुलांमधल्या लठ्ठपणाच्या समस्येवर आरोग्यदायी जीवनशैलीचे उपाय या ४ मुद्द्यांवर भर देण्यात येणार आहे. गरोदर महिला, स्तन्यदा माता, कुमारवयीन मुली , आणि ६ वर्षांपर्यंतची सर्व बालकं यांच्यात आढळणाऱ्या कुपोषणावर मात करण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी हा उपक्रम सुरु केला होता. केंद्रीय महिला आणि बालकल्याण मंत्री सावित्री ठाकूर उद्या या निमित्त १८ सहभागी मंत्रालयांच्या अधिकाऱ्यांना वेबकास्टद्वारे संबोधित करतील. सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातल्या महिला आणि बालकल्याण मंत्रालयांचे अधिकारी आणि अंगणवाडी सेविका या कार्यक्रमात दूरस्थ पद्धतीने उपस्थित राहतील.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.