April 24, 2025 7:53 PM | Pope Francis

printer

पोप फ्रान्सिस यांच्यावर येत्या २६ तारखेला अंत्यसंस्कार

कॅथलिक ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांच्यावर येत्या २६ तारखेला अंत्यसंस्कार केले जाणार असून त्यादिवशी भारतात राजकीय शोक पाळण्यात येणार आहे. गृहमंत्रालयाने दिलेल्या एका निवेदनानुसार, संपूर्ण भारतात जिथे नियमितपणे राष्ट्रध्वज फडकावला जातो, त्या सर्व इमारतींवर राष्ट्रध्वज अर्ध्यावर फडकावला जाईल. तसंच, त्या दिवशी मनोरंजनाचे कोणतेही अधिकृत कार्यक्रम होणार नाहीत. याआधी सरकारने पोप फ्रान्सिस यांच्या निधनाबद्दल तीन दिवसांचा राष्ट्रीय शोक जाहीर केला होता.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.