डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

May 18, 2025 1:52 PM | Pope Leo

printer

नवनियुक्त पोप लिओ चौदावे यांचा शपथविधी होणार

नवनियुक्त पोप लिओ चौदावे यांचा शपथविधी आज व्हॅटिकन सिटीच्या सेंट पीटर्स चौकात होणार आहे. जगभरातून मान्यवर या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत.अमेरिकेचे उपाध्यक्ष जे. डी. व्हान्स, त्यांच्या पत्नी उषा व्हान्स, परराष्ट्रमंत्री मार्को रुबियो तसंच कॅनडाचे प्रधानमंत्री मार्क  कार्नी यांचा त्यात समावेश आहे. रोमन कॅथलिक चर्चचे पोप फ्रान्सिस यांचं गेल्या ८ मे रोजी निधन झाल्यानंतर रॉबर्ट फ्रान्सिस प्रेवोस्ट यांची निवड नवे पोप म्हणून झाली. शपथविधी झाल्यावर नव्या पोपना पारंपरिक पोशाख आणि अंगठी नजर करण्यात येईल नंतर ते पदभार स्वीकारतील.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा