दिवंगत पोप फ्रान्सिस यांचा उत्तराधिकारी निवडण्यासाठीची गोपनीय बैठक पुढील महिन्याच्या ७ तारखेपासून सुरू होणार असल्याचं व्हॅटिकननं जाहीर केलं आहे. गेल्या २१ एप्रिल रोजी पोप फ्रान्सिस यांचं निधन झाल्यानंतर सध्याच्या काळात व्यवस्थापन करणाऱ्या कार्डिनल्स चर्चच्या अधिवेशनात हा निर्णय घेण्यात आला.
यामधील परंपरेनुसार सिस्टीन चॅपलमध्ये मतदान होणार असून या प्रक्रियेच्या तयारीसाठी सिस्टीन चॅपल कालपासून पर्यटकांसाठी बंद करण्यात आलं आहे. जगभरातील २२५ कार्डिनलपैकी ८० वर्षांखालील केवळ १३५ कार्डिनल या निवडणुकीत मतदान करण्यास पात्र आहेत.