डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

राज्यात १५ हजार पोलीस भरती करायला मंजुरी

राज्याच्या पोलीस दलात सुमारे १५ हजार शिपाई भरती करायला राज्य मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. राज्यातल्या रास्त भाव दुकानदारांच्या नफ्यात वाढ करण्याचा  निर्णयही मंत्रिमंडळानं घेतला. आता या दुकानदारांना प्रतिक्विंटल दीडशे ऐवजी १७० रुपये फायदा मिळेल. सोलापूर – पुणे मुंबई हवाई  मार्गासाठी व्यापारी तूट भरुन काढण्यासाठी निधी देण्याचा निर्णयही आज झाला. याशिवाय, सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाअंतर्गत येणाऱ्या महामंडळांतर्फे राबवण्यात येणाऱ्या विविध कर्ज योजनेतल्या जामीनदारीच्या अटी शिथिल करायला आणि शासन हमीला पाच वर्षांची मुदतवाढ द्यायलाही मंत्रिमंडळानं मंजुरी दिली.