डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

पाकिस्तानमधे तहरीक ए इन्साफ पक्षाच्या काही खासदारांना पोलिसांकडून अटक

पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद इथे काल रात्री माजी प्रधानमंत्री इमरान खान यांच्या तहरीक ए इन्साफ या पक्षाच्या काही खासदारांना पोलिसांनी अटक केली. 

या पक्षाचे नेते आणि कार्यकर्त्यांनी इस्लामाबादमध्ये ८ सप्टेंबर रोजी मोर्चाचं आयोजन केलं होतं. मात्र, कार्यकर्त्यांनी यावेळी वाहतुकीचे नियम मोडत सामान्यांसाठी निर्धारित असलेल्या रस्त्यावर मोर्चा नेला. त्यांना रोखणाऱ्या जवानांवर दगडफेक झाल्याने पोलिसांनी संरक्षणासाठी लाठीचार्ज करत अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. त्यानंतर या मोर्चेकऱ्यांना अटक झाल्याची माहिती पाकिस्तानी पोलिसांनी दिली आहे. या मोर्चानंतर पोलिसांनी तहरीक ए इन्साफ या पक्षाच्या नेत्यांना अटक केली.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.