डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

June 1, 2025 5:00 PM | Poland Votes

printer

पोलंडमध्ये अध्यक्षपदासाठी अंतिम टप्प्यातलं मतदान सुरु

पोलंडमध्ये आज अध्यक्षपदासाठी अंतिम टप्प्यातलं मतदान होत आहे. वॉर्सॉचे महापौर राफाल ट्र्झास्कोव्स्की आणि इतिहासकार करोल नव्रॉकी यांच्यात ही चुरशीची लढत आहे.

 

ट्र्झास्कोव्स्की हे उदारमतवादी युरोपियन युनियनचे समर्थक असून, न्यायसुधारणा आणि गर्भपात हक्क यांचे समर्थक आहेत. तर नव्रॉकी हे पारंपरिक मूल्यांचे पुरस्कर्ते असून आणि युरोपियन युनियनबाबत साशंक आहेत.

 

नव्या राष्ट्राध्यक्षांकडे कायदयांना मंजूरी देण्याचा किंवा नकार देण्याचा अधिकार असेल. या निवडणुकीचे निकाल उद्या अपेक्षित असून, त्यामुळे पोलंडची यापुढील राजकीय वाटचाल ठरणार आहे.