तैवानमध्ये पोडुल चक्रीवादळ धडकण्यापूर्वी हजारो लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. पोडुल चक्रीवादळ आग्नेय दिशेकडे सरकत असून ते आज दुपारपर्यंत ताईतुंग शहराला धडकण्याची शक्यता असल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे. तैवानमध्ये नऊ शहरांमध्ये आज शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. तसंच अनेक देशांतर्गत उड्डाणं ही रद्द केली आहेत.
Site Admin | August 13, 2025 2:21 PM | podul cyclone
पोडुल चक्रीवादळ आज दुपारपर्यंत ताईतुंग शहराला धडकण्याची शक्यता
