डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

February 14, 2025 10:23 AM | PM Narendra Modi | US

printer

अमेरिका भेटीत प्रधानमंत्र्यांनी अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मायकल वॉल्ट्झ यांची घेतली भेट

अमेरिका भेटीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज वॉशिंग्टन डीसी मध्ये अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मायकल वॉल्ट्झ यांचीही भेट घेतली. संरक्षण, तंत्रज्ञान आणि सुरक्षा या मुद्यांवर यावेळी सविस्तर चर्चा झाली. कृत्रिम बुद्धिमत्ता, सेमीकंडक्टर्स आणि अवकाश तंत्रज्ञान यासारख्या क्षेत्रात परस्पर सहकार्याची मोठी क्षमता आहे,असं पंतप्रधान मोदी यांनी या भेटीनंतर समाजमध्यमावरील संदेशात म्हटलं आहे.

 

दरम्यान, मोदी यांनी अमेरिका दौऱ्यात भारतीय-अमेरिकन उद्योजक आणि रिपब्लिकन पक्षाचे नेते विवेक रामास्वामी यांचीही भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये भारत-अमेरिका संबंध, नावीन्य, जैवतंत्रज्ञान आणि भविष्य घडवण्यात उद्योजकतेची भूमिका यावर यावेळी अभ्यासपूर्ण चर्चा झाली. पंतप्रधान मोदी यांनी टेस्लाचे मुख्य कार्यकारी अधिकारी एलॉन मस्क यांचीही भेट घेऊन चर्चा केली.