प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज कोलकाता इथं संरक्षण दलाच्या संयुक्त कमांडरर्स परिषदेला संबोधित करणार आहेत. भारतीय लष्कराच्या पूर्व कमांड मुख्यालय, असलेल्या विजय दुर्ग इथं कमांडर्स परिषदेचे उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे. ही परिषद 17 सप्टेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह या कार्यक्रमात उपस्थित राहतील. या कार्यक्रमांत सहभागी होण्यासाठी प्रधानमंत्री काल संध्याकाळी कोलकाता इथं पोहोचले.
जगातिक स्तरावर सध्या सुरु असलेल्या राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर तांत्रिक प्रगती, सशस्त्र दलांच्या तिन्ही शाखांमधील समन्वय, आधुनिकीकरण आणि इतर पैलूंवर चर्चा होणार आहे. त्यानंतर प्रधानमंत्री आज बिहारच्या दौऱ्यावर जाणार आहेत. पूर्णिया जिल्ह्यात 36 हजार कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचा शुभारंभ करतील. उत्तर बिहारमध्ये नव्याने विकसित झालेल्या विमानतळाचं उद्घाटन आणि राष्ट्रीय मखाना मंडळाचं उद्घाटनही मोदींच्या हस्ते होणार आहे.