डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्यापासून सायप्रस, कॅनडा आणि क्रोएशियाच्या दौऱ्यावर

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्यापासून पाच दिवस सायप्रस, कॅनडा आणि क्रोएशियाच्या दौऱ्यावर जाणार आहेत. सायप्रसचे राष्ट्रपती निकोस क्रिस्टोडोलाइड्स यांच्या निमंत्रणावरून ते उद्या सायप्रसला भेट देतील. या दौऱ्यादरम्यान ते राष्ट्राध्यक्ष क्रिस्टोडोलाइड्स यांच्याशी चर्चा करतील, तसंच लिमासोल इथं उद्योगपतींशी संवाद साधतील. दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात, कॅनडाचे प्रधानमंत्री मार्क कार्नी यांच्या निमंत्रणावरून प्रधानमंत्री मोदी १६ जून रोजी कॅनडाच्या कानानास्किस इथं जी-७ परिषदेत सहभागी होणार आहेत. इथं ते जी-७ देशांच्या नेत्यांशी विविध विषयांवर चर्चा करतील, तसंच परिषदेच्या पार्श्वभूमीवर विविध द्विपक्षीय बैठकाही घेतील.

 

शेवटच्या टप्प्यात प्रधानमंत्री मोदी १८ जून रोजी क्रोएशियाला भेट देतील. भारताच्या प्रधानमंत्र्यांनी क्रोएशियाला भेट देण्याची ही पहिलीच वेळ आहे. या दौऱ्यादरम्यान ते क्रोएशियाचे प्रधानमंत्री आंद्रेज प्लेनकोविच यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करतील, तसंच क्रोएशियाचे राष्ट्राध्यक्ष झोरान मिलानोविच यांचीही ते भेट घेणार आहेत.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा