डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

November 21, 2025 7:55 PM | PMBJP Scheme

printer

प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी परियोजनेमुळे नागरिकांची ४० हजार कोटींची बचत

प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी परियोजनेमुळे गेल्या अकरा वर्षांत नागरिकांच्या सुमारे ४० हजार कोटी रुपयांची बचत झाली आहे. गेल्या अकरा वर्षांमध्ये देशातल्या जनौषधी केंद्रांची संख्या २१० पट वाढली असून विक्रीतही २७० पट वाढ झाली आहे. सध्या देशभरात सुमारे १७ हजार जनौषधी केंद्र कार्यरत असून येत्या मार्चपर्यंत ही संख्या वीस हजारांपर्यंत आणि मार्च २०२७ पर्यंत २५ हजारावर  नेण्याचा सरकारचा मानस आहे.