प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज तमिळनाडुतील कोइम्बतूर इथं दक्षिण भारत नैसर्गिक शेती शिखर परिषदेचं उद्घाटन करतील. सेंद्रिय शेतकरी दिवंगत नम्मलवार यांनी राबविलेल्या नैसर्गिक शेती पद्धतींचं प्रदर्शन करण्याचा या शिखर परिषदेचा उद्देश आहे.
प्रधानमंत्री नैसर्गिक शेती करणाऱ्या शेतकऱ्यांशी यावेळी संवाद साधतील. 9 कोटी शेतकऱ्यांसाठी 18 हजार कोटी रुपयांचा एकविसावा पीएम-किसान हप्ता देखील त्यांच्या हस्ते वितरित करण्यात येईल.