भाजपाचं सरकार पश्चिम बंगाल मधल्या विविध क्षेत्रांमध्ये संपर्क वाढवण्यासाठी प्रयत्नशील असून बंगालचा सर्वांगीण विकास करण्यासाठी प्राधान्य देत आहे, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. पश्चिम बंगाल मधल्या नादिया जिल्ह्यातल्या राणाघाट इथं सुमारे ३२०० कोटी रुपयांच्या दोन राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांची पायाभरणी आणि उदघाटन मोदी यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते दूरध्वनीच्या माध्यमातून बोलत होते. कार्यक्रमस्थळी दाट धुकं आणि कमी दृश्यमानता असल्यानं प्रधानमंत्र्यांचं हेलिकॉप्टर हेलिपॅडवर उतरू शकलं नाही, त्यांना कोलकत्ता विमानतळावर परतावं लागलं. हे महामार्ग प्रकल्प म्हणजे कोलकत्ता आणि सिलिगुडीला जोडणारा एक महत्वाचा दुवा असून यामुळे प्रवासाचा वेळ तब्बल दोन तासांनी वाचणार आहे. यावेळी मोदी यांनी नादिया जिल्ह्यातल्या राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामाचं देखील उदघाटन केलं.
Site Admin | December 20, 2025 6:27 PM | Prime Minister Narendra Modi
बंगालच्या सर्वांगीण विकासासाठी प्राधान्य-प्रधानमंत्री