प्रधानमंत्री बिहार तसंच पश्चिम बंगाल दौऱ्यात विविध विकास प्रकल्पांचं उद्घाटन करणार

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज बिहार तसंच पश्चिम बंगालला भेट देणार आहेत. या दौऱ्यात ते राज्याच्या पूर्व चंपारण जिल्ह्यातील मोतीहारी इथं7 हजार दोनशे कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी, उद्घाटन आणि लोकार्पण करणार आहेत. रेल्वे, रस्ते, ग्रामीण विकास, मत्स्यव्यवसाय, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान या क्षेत्रातल्या प्रकल्पांचा यामध्ये समावेश आहे. त्यानंतर बंगालमधील दुर्गापूर इथंही पंतप्रधानांच्या हस्ते 5 हजार कोटींहून अधिक खर्चाच्या महत्त्वाच्या प्रकल्पांचीही पायाभरणी आणि लोकार्पण होणार आहे.