सन २०३६ मध्ये होणाऱ्या ऑलिम्पिकचं यजमानपद मिळवण्याकरता भारत जोरदार प्रयत्न करत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. उत्तर प्रदेशात वाराणसी इथं होत असलेल्या राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धांचं उद्घाटन त्यांनी आज दूरस्थ पद्धतीनं केलं, त्यावेळी ते बोलत होते. विविध खेळांमध्ये २०१४ सालापासून देशाची कामगिरी सातत्यानं सुधारत असून ‘जेन झी’ची तरुण पिढी हातात तिरंगा घेऊन भारताचं प्रतिनिधित्व करताना पाहून देशाचा उर अभिमानानं भरून येतो. प्रत्येकाला आपापल्या भूमिका निभावतानाच त्यांच्या जबाबदाऱ्याही पार पाडायच्या असतात. मात्र, जेव्हा प्रत्येकजण आपापल्या जबाबदाऱ्या गांभीर्यानं पार पाडजतो, तेव्हाच यशाचं शिखर गाठता येतं. देशाचा प्रवासही याच दिशेनं होत असल्याचं प्रधानमंत्र्यांनी म्हटलं आहे.
Site Admin | January 4, 2026 1:56 PM
राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धांचं प्रधानमंत्र्यांच्या हस्ते वाराणसीत उद्घाटन