प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज मध्य प्रदेशच्या दौऱ्यावर जाणार आहेत. त्यांच्या हस्ते दुपारी धार इथं “स्वस्थ नारी सशक्त परिवार” आणि “8 व्या राष्ट्रीय पोषण माह” अभियानाला प्रारंभ होणार आहेत. ही मोहीम आजपासून दोन ऑक्टोबर पर्यंत सुरू राहील. या कालावधीत देशभरातली आयुष्मान आरोग्य मंदिरं, सामुदायिक आरोग्य केंद्रं, जिल्हा रुग्णालये आणि इतर सरकारी आरोग्य सुविधा केंद्रांमध्ये आयोजित केली जाणार आहे.
या मोहिमेद्वारे देशभरात रक्तदान मोहीम देखील राबवली जाईल तसेच दात्यांची नोंद ई-रक्तकोष पोर्टलवर करण्यात येणार आहे. त्याशिवाय, माता आणि बाल आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या ‘सुमन सखी चॅटबॉट’चा प्रारंभ प्रधानमंत्र्यांच्या हस्ते होईल. त्याशिवाय मध्य प्रिदेशातल्या नागरिकांसाठी काही विशेष मोहिमांचा प्रारंभ देखील पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे.