February 10, 2025 8:25 PM | PM Ujjwala Yojana

printer

राज्यसभा : प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेंतर्गत १० कोटी एलपीजी जोडण्या

प्रधानमंत्री उज्ज्वला योजना २०१६ला सुरू झाल्यापासून आतापर्यंत लाभार्थ्यांना १० कोटी एलपीजी जोडण्या दिल्या आहेत, अशी माहिती केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू राज्यमंत्री सुरेश गोपी यांनी राज्यसभेत एका लिखित प्रश्नाला उत्तर देताना दिली. एलपीजी जोडणीसाठी अजून २९ लाख अर्ज प्रलंबित असल्याचंही त्यांनी सांगितलं. हे अर्ज मंजूर करण्यासाठी कोणतीही कालमर्यादा निश्चित केलेली नाही असं त्यांनी सांगितलं.