डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नेपाळच्या हंगामी प्रधानमंत्री सुशीला कार्की यांच्याशी संवाद साधला

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज नेपाळच्या हंगामी प्रधानमंत्री सुशीला कार्की यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला. नेपाळमधील सद्यस्थितीबद्दल चर्चा केल्याचं प्रधानमंत्री मोदी यांनी समाज माध्यमावर लिहिलेल्या संदेशात म्हटलं आहे. काही दिवसांपूर्वी युवा पिढीनं केलेल्या आंदोलनात झालेल्या जीवितहानीबद्दल तीव्र शोक व्यक्त केला. नेपाळमध्ये शांतता आणि स्थैर्य पुन्हा प्रस्थापित केल्या जाणाऱ्या प्रयत्नांना भारताचा ठाम पाठिंबा आहे, असंही प्रधानमंत्र्यांनी नमूद केलं. नेपाळमध्ये उद्या साजरा केल्या जाणाऱ्या राष्ट्रीय दिनाच्या शुभेच्छाही प्रधानमंत्री मोदी यांनी कार्की आणि नेपाळी जनतेला दिल्या.