देशाच्या युवावर्गाची स्वप्ने रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून पूर्ण होत आहेत, असं प्रधानमंत्र्यांनी नवी दिल्लीतल्या सतराव्या रोजगार मेळाव्याला व्हिडीओ संदेशाच्या माध्यमातून संबोधित करताना म्हटलं आहे. प्रधानमंत्र्यांच्या हस्ते नियुक्तीपत्र वितरणाचा कार्यक्रम आज सतराव्या रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून देशभरात होत आहे. या रोजगार मेळाव्यात वेगवेगळ्या सरकारी खात्यांमध्ये पद मिळालेल्या ५१ हजार उमेदवारांना नियुक्तीपत्रे देण्यात आली. रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून आतापर्यंत ११ लाख नियुक्त्या करण्यात आल्याचं प्रधानमंत्र्यांनी यावेळी सांगितलं.
त्यांनी यावेळी विकसित भारत योजनेची घोषणा केली. साडेतीन कोटी युवकांना रोजगार देण्याचं उद्दिष्ट या योजनेतून साध्य करण्याचं उद्दिष्ट आहे.
या मेळ्याचा भाग म्हणून मुंबईत झालेल्या कार्यक्रमात राज्याचे मंत्री आशिष शेलार आणि महाराष्ट्र गोवा सर्कलचे पोस्ट मास्टर जनरल अमिताभ सिंह यांच्या हस्ते ८० उमेदवारांना नियुक्तीपत्र दिली गेली. याविषयी उमेदवारांनी आकाशवाणीकडे समाधान व्यक्त केलं.
नागपूरात झालेल्या रोजगार मेळाव्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी उमेदवारांना नियुक्तीपत्रं दिली.