प्रधानमंत्र्यांच्या हस्ते २७ डिसेंबरला स्वामित्व योजनेचा शुभारंभ

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या २७ डिसेंबरला स्वामित्व योजनेचा प्रारंभ होत आहे. देशातल्या सर्व जिल्ह्यांत डिजिटल पद्धतीनं जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ऑनलाईन माध्यमातून हा कार्यक्रम होईल. भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपूर इथं ही माहिती दिली. पन्नास लाखांहून अधिक मालमत्ता कार्डांचं वितरण याकार्यक्रमात केलं जाणार आहे.