प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं RBIचं कौतुक

ब्रिटनमधल्या सेंट्रल बँकिंग, लंडननं डिजिटल ट्रान्सफॉर्मशन अवॉर्ड २०२५ साठी रिझर्व्ह बँकेची निवड केल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी बँकेचं अभिनंदन केलं आहे. या निवडीतून  बँकेची नाविन्यता आणि प्रशासनातील  कार्यक्षमता प्रतिबिंबित होते, असं त्यांनी म्हटलं आहे. डिजिटल नवोन्मेषमुळे भारतातील वित्तीय परिसंस्था आणि अनेकांचं आयुष्य बळकट व्हायला मदत होईल, असं त्यांनी म्हटलं आहे.