राजस्थानात प्रधानमंत्र्यांच्या हस्ते ४६,३०० कोटी रुपये खर्चाच्या २४ प्रकल्पांची पायाभरणी आणि लोकार्पण

गेल्या वर्षभरात राजस्थानात झालेली प्रगती ही भविष्यातल्या अनेक वर्षातल्या प्रगतीची मुहूर्तमेढ ठरली आहे, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं. राजस्थान राज्य सरकार स्थापनेला एक वर्ष झाल्याच्या पार्श्वभूमीवर जयपूर इथे आयोजित एक वर्ष परिणाम उत्कर्ष या कार्यक्रमावेळी ते बोलत होते. यावेळी मोदी यांनी ४६ हजार ३०० कोटी रुपये खर्चाच्या ऊर्जा, रस्ते, रेल्वे आणि पाणीपुरवठा या क्षेत्रातल्या २४ प्रकल्पांची पायाभरणी आणि लोकार्पण केलं.