हत्तींच्या संरक्षण आणि संवर्धनाच्या प्रयत्नांची प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडून प्रशंसा

जागतिक हत्ती दिनाच्या निमित्ताने देशात हत्तींच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी केल्या जाणाऱ्या प्रयत्नांची प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी प्रशंसा केली. हत्ती हे आपल्या इतिहास आणि संस्कृतीशी जोडलेले आहेत, असं प्रधानमंत्री आपल्या समाजमाध्यमावरल्या संदेशात म्हणाले. हत्तींना राहायला अनुकूल वातावरण मिळण्यासाठी शक्य त्या सर्व सुविधा पुरवण्यासाठी आपण वचनबद्ध असल्याचंही प्रधानममंत्री यांनी सांगितलं. तसंच मागच्या काही वर्षात हत्तींच्या संख्येत वाढ झाल्याबद्दलही त्यांनी समाधान व्यक्त केलं.