प्रधानमंत्री नरेंद्र मोदी २५ जुलैपासून दोन दिवसांच्या मालदीव दौऱ्यावर

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या २५ जुलैपासून दोन दिवसांच्या मालदीव दौऱ्यावर जाणार आहेत. या भेटीदरम्यान ते मालदीवमधल्या अनेक विकास प्रकल्पांचं उद्घाटन करतील. या भेटीत प्रधानमंत्री आणि मालदीवचे राष्ट्रपती मुइझ्झू  यांच्यात महत्त्वाच्या द्विपक्षीय आणि प्रादेशिक मुद्द्यांवर उच्चस्तरीय चर्चा होईल. त्यानंतर अनेक संयुक्त प्रकल्पांचं उद्घाटन केलं जाईल. याशिवाय दोन्ही देशांमध्ये विविध क्षेत्रांमधलं परस्पर सहकार्य वाढवण्याच्या उद्देशानं अनेक सामंजस्य करारही केले जाणार आहेत.