November 13, 2024 8:40 PM | PM Narendra Modi

printer

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या राज्यात ३ प्रचार सभा

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या राज्यात ३ प्रचार सभा घेणार आहेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये दुपारी, नवीमुंबई आणि मुंबईत शिवाजीपार्कवर संध्याकाळी ते सभा घेणार आहेत. 

विरोधी पक्षनेते राहुल गांधी उद्या दुपारी नंदूरबारमध्ये आणि त्यानंतर नांदेडमध्ये प्रचारसभेला संबोधित करतील. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे दुपारी नाशिक जिल्ह्यात इगतपुरीत आणि संध्याकाळी पुण्यात प्रचार सभा घेणार आहेत.