राष्ट्रीय सुरक्षेच्या संदर्भात आढावा घेण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज विविध विभाग आणि मंत्रालयाच्या सचिवांची उच्चस्तरीय बैठक झाली. मंत्रालयाचे विविध विभाग आणि सुरक्षा यंत्रणांमधे समन्वयाची गरज प्रधानमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली. देशातल्या सद्याच्या स्थितीचा सामना करण्यासाठी केलेल्या तयारीचाही त्यांनी आढावा घेतला. या बैठकीत विविध मुद्द्यावर चर्चा झाली. संरक्षण यंत्रणा मजबूत करणं, अफवांना रोखणं आणि पायाभूत सुविधांची सुरक्षा सुनिश्चित करणं या मुद्यांचा यात समावेश आहे.
Site Admin | May 8, 2025 6:53 PM | Indian Army | PM Narendra Modi
राष्ट्रीय सुरक्षेच्या संदर्भात आढावा घेण्यासाठी प्रधानमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक
