प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या हरियाणाच्या दौऱ्यावर

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या हरियाणाला भेट देणार आहेत. सर्वप्रथम ते हिसार ते अयोध्या या नव्यानं सुरू होणाऱ्या विमान उड्डाण सेवेला हिरवा झेंडा दाखवतील आणि हिसार विमानतळाच्या नवीन टर्मिनल इमारतीची पायाभरणी करतील. हिसार इथं ते एका जाहीर सभेला संबोधित करणार आहेत. त्यानंतर, यमुनानगर इथं दीनबंधू छोटूराम औष्णिक वीज केंद्राच्या 800 मेगावॅट आधुनिक औष्णिक वीज प्रकल्पाची ते पायाभरणी करतील. या प्रकल्पामुळे हरियाणात गावोगावी अखंडित वीजपुरवठा करण्याच्या कामाला चालना मिळणार आहे.  भारतमाला परियोजनेअंतर्गत सुमारे 170 कोटी रुपये किमतीच्या सुमारे साडे चौदा किलोमीटर रेवाडी बाह्य वळणमार्गाचं उद्घाटनही मोदी करतील. यामुळे दिल्ली ते नारनौल प्रवासाचा वेळ सुमारे एक तासाने कमी होईल.