डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

विश्वविजेत्या महिला खेळाडूंनी ‘फिट इंडियाचा’ संदेश सर्वत्र पोहोचवावा – प्रधानमंत्री मोदी

विश्वचषक विजेत्या महिला क्रिकेट संघातल्या खेळाडूंनी ‘फिट इंडियाचा’ संदेश सर्वत्र पोहोचवावा, तसंच तंदुरुस्त राहण्यासाठी तरुणांना प्रोत्साहित करावं, असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. प्रधानमंत्री यांनी दिल्लीतल्या त्यांच्या निवासस्थानी महिला विश्वचषक विजेत्यांची भेट घेतली, त्यावेळी ते बोलत होते. मोदी यांनी महिला क्रिकेट संघाचं अभिनंदन केलं तसंच सलग तीन पराभवानंतर देखील संघानं स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत जोरदार पुनरागमन केल्याबद्दल कौतुक केलं. मोदी यांनी खेळाडूंना कठोर  परिश्रम करत राहण्याचा सल्ला दिला असून प्रधानमंत्री प्रोत्साहनाचा स्रोत असल्याची भावना महिला खेळाडूंनी यावेळी व्यक्त केली.