देशभरात धनत्रयोदशीचा उत्साह; प्रधानमंत्र्यांच्या देशवासियांना शुभेच्छा

देशभरात आज दिवाळीचा दुसरा दिवस म्हणजेच धनत्रयोदशी साजरी होत आहे. आजच्या दिवशी धनाची आणि धानाची तसंच देवांचे वैद्य असलेल्या धन्वंतरींची पूजा आज केली जाते. धणे आणि गूळ यांचा नैवेद्य दाखवला जातो. या निमित्ताने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. भगवान धन्वंतरींच्या कृपेमुळे सर्वांना आयुष्य, आरोग्य, आनंद आणि समृद्धी लाभो अशी मी कामना करतो, असं मोदी त्यांच्या समाज माध्यमावरच्या शुभेच्छा संदेशात म्हणाले आहेत. आज साजऱ्या होणाऱ्या आयुर्वेद दिनानिमित्तही प्रधानमंत्र्यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात शुभेच्छा दिल्या आहेत. निरोगी जीवनशैलीसाठी आयुर्वेद उपयुक्त ठरतो. भगवान धन्वतंरींची जयंती ही आयुर्वेदाच्या उपयुक्ततेशी आणि योगदानाशी निगडित असल्याचं प्रधानमंत्री आपल्या शुभेच्छा संदेशात म्हणाले आहेत.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.