डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

स्वातंत्र्यप्राप्तीच्या शतकपूर्तीपर्यंत देश विकसित भारताचा संकल्प पूर्ण करेल – प्रधानमंत्री

देशातल्या मतदारांनी आपल्या सरकारवर तिसऱ्यांदा विश्वास व्यक्त केला असून यावेळचा अर्थसंकल्प या कार्यकाळातला पहिला पूर्ण अर्थसंकल्प आहे, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. दिल्लीमध्ये आज संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु होण्यापूर्वी  प्रसारमाध्यमांना ते संबोधित करत होते. भारताने लोकशाही राष्ट्र म्हणून ७५ वर्ष पूर्ण केली असून वर्ष २०४७ मध्ये जेव्हा भारत स्वातंत्र्याची १०० वर्षे पूर्ण करेल, तेव्हा देश विकसित भारताचा संकल्प पूर्ण करेल, असा विश्वास  प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी यावेळी व्यक्त केला. भारताला विकसित राष्ट्र बनवण्यासाठी संसदेच्या सर्व सदस्यांनी योगदान देण्याचं आवाहनही प्रधानमंत्री मोदी यांनी यावेळी केलं.