प्रधानमंत्र्यांच्या हस्ते बिहारमध्ये विकास कामांचं उद्घाटन

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज बिहारला भेट देणार असून, मधुबनी इथे राष्ट्रीय पंचायती राज दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते सहभागी होतील. या प्रसंगी, 13 हजार 480 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी पंतप्रधानच्या हस्ते होणार असून, रेल्वे आणि वीज क्षेत्रातील काही प्रकल्पाचं लोकार्पण त्यांच्या हस्ते होणार आहे. यात, जयनगर ते पाटणा दरम्यान धावणाऱ्या नमो भारत रॅपिड रेल्वे आणि सहरसा ते लोकमान्य टिळक टर्मिनस दरम्यान धावणाऱ्या अमृत भारत एक्सप्रेसला दूरस्थ माध्यमातून हिरवा झेंडा दाखवतील.