प्रधानमंत्र्यांच्या हस्ते ऍडव्हान्टेज आसाम परिषदेचं उद्घाटन होणार

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आसाममधल्या गुवाहाटी इथं आज ऍडव्हान्टेज आसाम या गुंतवणूक आणि पायाभूत सुविधाविषयक परिषदेचं उद्घाटन होणार आहे. उद्घाटन समारंभाला परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. एस. जयशंकर, केंद्रिय जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्वानंद सोनोवाल, आसामचे राज्यपाल एल. पी. आचार्य आणि मुख्यमंत्री हिमंता बिस्व सर्मा उपस्थित राहणार आहेत. दोन दिवसांच्या या परिषदेत आयोजित विविध सत्रांमध्ये औद्योगिक सुधारणा, जागतिक व्यापार भागीदारी आणि आसाममधील सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्रावर भर दिला जाणार आहे.