प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज पंजाबमधे आदमपूर इथं हवाईदलाच्या तळाला भेट दिली आणि तिथं हवाई दलाच्या जवानांशी संवाद साधला. सेनादलांच्या जवानांबद्दल देशाला कृतज्ञता असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. आणि जवानांचं मनोबल वाढवलं. तिथल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रधानमंत्र्यांना सद्यस्थितीविषयी सविस्तर माहिती दिली. आदमपूर हवाई तळावर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं भाषण होणार असून त्याचं थेट प्रसारण आज दुपारी साडेतीन वाजता आकाशवाणीवरुन होणार आहे.
Site Admin | May 13, 2025 2:59 PM | Adampur Airbase | PM Narendra Modi
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा हवाईदल जवानांशी संवाद
