प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या भेटीत ते नदिया जिल्ह्यातील राणाघाट इथं सुमारे 32 शे कोटी रुपयांच्या विकासकामांचं भूमिपूजन आणि उद्घाटन करणार आहेत. महामार्ग आणि रस्ते प्रकल्पांचा यामध्ये समावेश आहे.
पश्चिम बंगालनंतर प्रधानमंत्री दोन दिवसांच्या आसाम दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यात ते सुमारे 15 हजार 600 कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी करतील. प्रधानमंत्री आज गुवाहाटी इथल्या लोकप्रिय गोपीनाथ बोरदोलोई आंतरराष्ट्रीय विमानतळावर अत्याधुनिक बांबू बाग टर्मिनल इमारतीचं उद्घाटन करतील. ‘बांबू बाग’ या विषयाला वाहिलेल्या या टर्मिनलद्वारा आसामची जैवविविधता आणि सांस्कृतिक वारसा प्रतिबिंबित होतो.